भारतीय केळीसाठी जागतिक बाजारात वाढती संधी

भारतीय केळीसाठी जागतिक बाजारात वाढती संधी

INDIAN BANANA (भारतीय केळी)–वर्ष २०२२-२३ मधील पहिल्या ३ महिन्यांत (जानेवारी ते मार्च) भारतातून केळीची 2 हजार कंटेनरची निर्यात झाली होती. त्या तुलनेत वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या ३ महिन्यात (जानेवारी ते मार्च) केळीची निर्यात वाढून ती 3,500 ते 4,000 हजार कंटेनर पर्यंत गेली आहे. याचा अर्थ केळीच्या निर्यातीत 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय केळीला मध्यपूर्वेतील देशांतून इक्वेडोर आणि फिलिपाईन्सच्या या केळीतील आघाडीच्या देशांच्या तुलनेत चांगली मागणी होत असल्याचे चित्र आहे. मागील २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतातून १८ हजार कंटेनर निर्यात झाले होते. नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये भारतातून ३० हजार कंटेनर केळीचे निर्यात झाले आहेत. जागतिक बाजाराचा हा कल भारतीय केळी उत्पादकांसाठी येणाऱ्या काळातील संधी ठरणारा आहे.

मार्केट वाढतेय. आलेख वाढता आहे. त्यात दरवर्षी अंदाजे ४० टक्के वाढ होत आहे.

मे महिन्यात तापमान जास्त प्रमाणात होते. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ते ४० अंशाच्या वरच राहिले. त्यामुळे केळीचा पक्वता कालावधी लवकर आला. त्यामुळे एकाच वेळी केळीचे उत्पादन आल्यामुळे बाजारातील आवकही त्या प्रमाणात वाढली. परिणामी केळीच्या दरात २० ते २५ टक्क्यांची घट झाली. दरम्यान मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यापासून केळीची आवक घटली. या स्थितीत केळीच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. हे दर येत्या काळात टिकून राहतील अशी स्थिती आहे. ही स्थिती आता बहुतांश स्थिरावली आहे.
मे महिन्यात जळगाव भागातील केळीचा हंगाम जोरात सुरु आहे. या भागातील बहुतांश उत्पादन हे देशांतर्गत बाजारासाठी होते तर सोलापूर भागातील बहुतांश केळी उत्पादन हे निर्यातीसाठी सुरु आहे.
सोलापूर भागातील प्रिमिअम मालाला इतर विभागांच्या किलोला तुलनेत १० ते १२ टक्के जास्त भाव मिळत आहे.

मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात गुजरात भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला त्याचा फटका तेथील केळी पिकाला बसला. यामुळे बाजारातील पुरवठा कमी झाले आणि किमतीत थोडी वाढ झाली. या महिन्यात केळीच्या निर्यातीत घट झालेली आहे. मागील महिन्यात रमजान ईद दरम्यान निर्यातक्षम केळीच्या दराने चांगली उसळी घेतली होती ते दर नंतर महिनाभर टिकून राहिले.
मात्र मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे केळीच्या टिकवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला. या स्थितीत निर्यातदारही धोका पत्करण्याची तयारी ठेवीत नसल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम निर्यातीत घट होण्यावरही झाला आहे. काही प्रमाणात सोलापूर भागात प्रिकुलिंग व्यवस्था असल्यामुळे तेथील माल तत्काळ मुंबई येथे व तिथून पुढे मध्यपूर्व देशांत निर्यातीसाठी पाठविणे शक्य होत आहे. जळगाव भागात मात्र अशा सुविधांचा अभाव असून वाहतुकीसाठी अधिकचे अंतर असल्याने त्या भागातून केळी निर्यातीला खूपच मर्यादा येत आहेत.
जून आणि जुलै महिन्यात केळीचे हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. तसेच जुलै महिन्यात देखील नवीन केळीची लागवड स्थिर प्रमाणात आहे. मागील वर्षीची आकडेवारी पाहता याही वर्षी केळी रोपांची मागणीही त्याच प्रमाणात आहे.
जून, जुलै महिन्यात जळगाव, चाळीसगाव या भागातून केळीची आवक होते. याच दरम्यान गुजरात च्या काही भागातूनही आवक होते. या भागातील आवक स्थिती पाहता येत्या काळात केळीच्या दरात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे
जून जुलै, ऑगस्ट मध्ये देशांतर्गत बाजारात केळीला मागणी वाढते मात्र या काळात निर्यातीची आवक व मागणी ४० टक्क्यांनी घटते हा मागील अनेक वर्षांचा मार्केटचा ट्रेण्ड राहीला आहे.

रविवार ( ता.14 जुलै ) रोजी जाहीर केलेल्या 15 जुलै साठी बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

याचे मुख्य कारण पावसाळ्यातील माल हा नेहमीपेक्षा लवकर खराब होतो. सतत पाऊस सुरु झाल्यास केळीची टिकवणक्षमता कमी होते. त्यामुळे निर्यातदार या काळात व्यापाराचा धोका पत्करीत नाहीत.
मात्र याच काळात आंब्याचा हंगाम कमी झाल्यामुळे पर्यायी फळ बाजारात नसल्यामुळे स्थानिक म्हणजेच देशांतर्गत बाजारात केळीला मागणी वाढलेली असते. हे पाहता जून महिन्यात केळीची मागणी व दर स्थिर वाढण्याची शक्यता दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *