Maharashtra Din 2024 : आज ‘महाराष्ट्र दिन’, यानिमित्त जाणून घ्या या दिनाचा इतिहास आणि महत्त्व.

Maharashtra Din 2024 : आज ‘महाराष्ट्र दिन’, यानिमित्त जाणून घ्या या दिनाचा इतिहास आणि महत्त्व.

Maharashtra Din 2024 : 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

Maharashtra Din 2024 : महाराष्ट्र दिन(Maharashtra Din 2024) हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते.

1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास

21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसं प्रचंड चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.

106 आंदोलकांचं हौतात्म्य

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळ धुमसत होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परंतु,जमाव पांगला नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 106 आंदोलकांना हौतात्म्य आलं.

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

Maharashtra Din Wishes in Marathi: महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Share on Whatsapp
Maharashtra Din Wishes in Marathi: महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
Maharashtra Day 2024: भारताच्या महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. १९६० मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस देतो. महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. १९६० मध्ये या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन नवीन राज्यांची निर्मिती झाली. मुंबई शहर हा दोन राज्यांमधील वादाचा विषय बनला. मुंबईतील बहुतेक लोक मराठी भाषा बोलतात म्हणून हे शहर महाराष्ट्र राज्यात आले. या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मराठीत मेसेज हवे असतील तर आम्ही या शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) घेऊन आलो आहोत.

बघा शुभेच्छा संदेश
> आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!

> महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!

> भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा !

> जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…

गुणगुणलो जे गीत गीत मराठी….

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

> लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…

मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

> सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया,

एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया,

महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!

> पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन

आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन

महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश!

Shukra Asta 2024 : बस कुछ घंटे बाद शुक्र ग्रह हो जाएंगे अस्त, शादियों पर विराम, ये है विवाह के शुभ मुहूर्त

Parshuram Jayanti 2024 Date: इस दिन मनाई जाएगी परशुराम जयंती, नोट करें सही डेट और महत्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *