Washim: वाशिमच्या शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग; काय आहे ही भन्नाट फार्मर कप स्पर्धा
वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने विषमुक्त सोयबीनची शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळवून दिलं आहे.
Washim: वाशिमच्या शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग; काय आहे ही भन्नाट फार्मर कप स्पर्धा
Washim Farmer Cup News: पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) वतीने जलसंधारणचे काम राज्यभरात करण्यात आलं आहे. परिणामी या माध्यमातून अनेक गावं दुष्काळमुक्त देखील झाली आहे. या प्रयोगाच्या यशानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि विष मुक्त शेतीतून पोषक धान्य मिळावे याकरता पाणी फाउंडेशनच्यावतीने फार्मर कपचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षी बाजी मारली ती वाशीमच्या जयपूर आणि विळेगाव येथील शेतकरी गटाने. विषमुक्त सोयबीनची शेती करून या शेतीला विषमुक्तचं मानांकनही मिळालं आहे. त्यामुळं गावातील शेतकरी गटाने गावात दिवाळीच साजरी केली. या कामगिरीनं गावकरी देखील खूश असून गावात उत्साहाचे वातावरण आहे.
सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट गांडूळ खत निर्मिती
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावांनी जल संधारणाची काम केली. या स्पर्धेमुळं अनेक गावावरी दुष्काळाचा डाग कायमस्वरूपी मिटल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जीवनात या स्पर्धेतून बदल घडावा यासाठी एक पाउल पुढं टाकत यंदा पानी फाऊंडेशनच्या वतीनं पहिल्यांदाच फार्मर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आले.
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातील शेतकरी गटांनी यावर्षी स्पर्धेच्या नैसर्गिक कीड व्यवस्थापन करत विषमुक्त सोयाबीन उत्पादित करण्याची यशस्वी प्रयोग केला आहे. याच उत्पादित सोयाबीनची पुणे येथील प्रयोगशाळेत या सोयाबीनच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या गटाची रात्रीच्या वेळेस डिजिटल पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. याच माध्यमातून कीटनाशक, खुरपणी, खताचं नियोजन, लागवड पद्धत आणि काढणीपासून कशा पद्धतीनं विष मुक्त शेतीमधून विष मुक्त धान्य पिकवू शकतो याचं मार्गदर्शन शेतकऱ्याना केलं गेलं.
Toxin-free Food : विषमुक्त अन्नासाठी शेतीपध्दतीत बदल आवश्यक
शेतकऱ्यांसाठी नोंदविलेल्या सहभागामुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षी विष मुक्त सोयाबीनचं धान्य उत्पादन केल्यामुळं प्रमाणित करण्यात आले. या गावानं प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गावाच्या विकासात पाणी फाऊंडेशनने दिलेल्या योगदान मोठं आहे. पानी फाऊंडेशनमुळं गाव दुष्काळ मुक्त झाल्याचं गावकरी सांगतात. आता विष मुक्त शेतीतून शेतकरी चांगले उत्पन्न घेऊन आपल्या शेतातील उत्पन्न खर्च कमी करून आपला आर्थिक विकास करत आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी या गावच्या शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर नक्की शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल यात मात्र शंका नाही .