महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी विविध ठिकाणचं मार्गदर्शन घेऊन चांगली शेती केली आहे. शेवग्याची लागवड सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे त्याचा भाव अधिक वाढला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर: (pune bhor) तालुक्यातील वेळू गावाचे प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले (farmer gulab ghule) यांची सध्या सगळीकडं चर्चा सुरु आहे. त्यांनी दोन एकर शेताच्या बांधावरती शेवग्याची लागवड केली होती. त्या झाडांना आता चांगल्या शेंगा आल्या आहेत. त्याची विक्री सुध्दा अधिक प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी गुलाब महादेव घुले यांना त्याचा फायदा होत आहे. ओडिसी शेवगा (Cultivation of fenugreek) असा प्रकार आहे. विशेष म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या झाडाला साडेचार फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा लावण्यात आल्या आहेत. सध्या ती शेती सगळ्यांसाठी आकर्षणाचं केंद्र झालं आहे.
महाराष्ट्रात अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बाहेर जाऊन मार्गदर्शन घेतलं आहे. तर काही शेतकऱ्यांनी युट्यूबच्या माध्यमातून शेतीचा प्रकार शिकून घेतला आहे. कांदा, केळी, आंबा, ऊस या प्रकारची अनेक पीकं शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं घेतली आहेत.
पुण्याच्या भोर तालुक्यातील वेळू गावाचे प्रयोगशील शेतकरी गुलाब महादेव घुले यांनी, ओडिसी शेवग्याच्या शेंगाच्या वाण लावून शेवग्याचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. 2 एकर क्षेत्रावरील शेतीच्या बांधावर शेवग्याची 70 झाडं लावत सेंद्रिय पद्धतीने शेती केली. झाडाला आलेल्या साडेचार फुट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा लांबीमुळे ग्राहकांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र झालंय. चवीला स्वादिष्ट, लांबीला उंच, पातळ साल, हिरवा रंग असणाऱ्या ह्या शेंगेला बाजारात चांगला भाव मिळत आहे.
टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मागच्या महिन्यात प्रचंड नुकसान झाले होते. सध्या बाजारात टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. इतर भाज्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये टोमॅटो १२० रुपयांनी विक्री केली जात आहे. हिरवी मिरची देखील १२० किलोने विक्री केली जात आहे. मेथी १२० ते १५०, कोथांबिर १२०, कोबी फ्लॉवर ६० ते ८०, गवार ४० ते ६०, भेंडी ६०, वांगे ३० ते ४०, शेवगा शेंग ८० ते 120, भाजीपाल्याचे अचानक भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.