राज्यभर आजपासून पावसाची हजेरी ? जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची स्थिती !

राज्यभर आजपासून पावसाची हजेरी ? जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची स्थिती !

 जळगावमान्सुनच्या वाटचालीत थोडी प्रगती झाल्याने राज्यभर आज शुक्रवार (ता.२१) पासून पावसाची चांगली हजेरी लागण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कोकणासह मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील  जळगाव, धुळे, नंदुरबार व इतर जिल्ह्यांमध्येही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ( Monsoon Update )

 

बऱ्याच दिवसांपासून मान्सुनची वाटचाल थांबल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र, राज्यात पुन्हा एकदा मान्सून पुढे सरकला आहे. येत्या ४८ तासांच्या कालावधीत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, मुंबईसह उपनगरातही आगामी काही तासांत जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच जालना, बीड, लातूरसह अन्य जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता.२१) सकाळी साडेआठपर्यंत २४ तासात पडलेला पाऊस (मिलीमीटर)
कोल्हापूर- १०.५, महाबळेश्वर- ६९.३, सातारा- २२.९. सोलापूर- ७.०, छत्रपती संभाजीनगर- ६.६, नांदेड- ३३.०, धाराशिव- ५.५, डहाणू- ८.७, हरणे- ४६.०, मुंबई- ३.९, रत्नागिरी- १३.७

Farmer Success Story: ‘या’ शेतकरी बंधूंचे चिकू बागेचे नियोजन पाहाल तर व्हाल अवाक! 6 एकरमधून घेत आहेत लाखो रुपयांचे उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *