शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पुढील चार दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, कुठं बरसणार जोराचा पाऊस ?
Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सऱ्या देखील पाहायला मिळत आहेत. तथापि, गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. मध्यंतरी अर्थातच 12 ते 20 जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाने दांडी मारली होती. मात्र त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरू झाला.
अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अक्षरशा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. अवकाळी पाऊस जसा बरसतो तसा मोसमी पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
गेल्या काही तासांपासून मात्र पावसाचा जोर थोडासा कमी झाला असून भारती हवामान खात्याने आगामी चार दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे.
भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठीक-ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
खरंतर काल मानसून ने देशातील अनेक भागांमध्ये प्रगती केली. संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने कधीच काबीज केला आहे. यानंतर मान्सूनने देशाच्या उर्वरित भागात देखील चांगली प्रगती केली आहे.
मात्र काल मान्सूनने देशाच्या कोणत्याच भागात प्रगती केली नाही. परंतु चिंता करण्याचे काहीही कारण नाही कारण मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी खूपच पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
बुधवार ( ता. 26 जून ) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा मानसून देशातील अन्य भागात प्रगती करणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवसांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आय एम डी ने आज आणि उद्या राज्यातील कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
राज्याच्या उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात सुद्धा ठिकठिकाणी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
विदर्भातील पूर्व भागात पावसाचा जोर अधिक राहणार असे म्हटले गेले आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी शक्यता IMD ने यावेळी वर्तवली आहे.