Natural Farming : विषमुक्त अन्नधान्याच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे

Natural Farming : विषमुक्त अन्नधान्याच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे

Dr. Swami Parmarthdevji : विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी केले.

Dr. Swami Parmarthdevji

विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण अधिकारीद्वारा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यर्थ्यासाठी विशेष योग, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद पध्दती, आहार आणि आरोग चिकित्सेत अन्नदाते शेतकरी यांची भूमिका या विषयावर परिसंवाद शुक्रवारी (ता. २९) पार पडला.

अध्यक्ष्यस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हे उपस्थित होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, पतंजली भारत स्वाभिमान न्यासचे राज्य प्रभारी भालचंद्रबापू पाडाळकर, पतंजली किसान सेवा समिती राज्य प्रभारी उदय वाणी यांची उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, की शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे वळावे. शिफारशीत कीडनाशके, रासायनिक खतांचा वापर करावा. स्वतःसाठी तसेच विक्रीसाठी विषमुक्त अन्नधान्ने, भाजीपाला यांचे उत्पादन घेवून सकस आहार निर्माण करावा. विषमुक्त शेतीसाठी जैविक उत्पादने हा एक उत्तम पर्याय आहे.

डॉ. स्वामी परमार्थदेवजी म्हणाले, की शुद्ध आणि सात्विक आहार असणे गरजेचे आहे, जसा आहार तसा विचार बनतो. शेतातील रासायनिक औषधाच्या अतिरिक वापरामुळे बहुतांश वेळेस अन्नामधून पोटामध्ये विष जाते. यामुळे अनेक विकार जडतात तसेच पर्यावरणास हानी देखील पोहचते, आज विषमुक्त अन्न मिळणे गरजेचे आहे.

जगाचा अन्नदाता म्हणून शेतकरी महत्वाची भूमिका बजावतात. शेतकऱ्यांनी नेसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळावे. विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करावी. प्रत्येकाने एकतरी देशी गाय पाळावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक पतंजली भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी धोंडीराम शेप यांनी केले तर सूत्रसंचालन सेंद्रिय शेती प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी मानले.

Weather forecast ;राज्याच्या या भागात पावसाची शक्यता कमी ; हवामान विभागाचा अंदाज…

विद्यापीठाचे कुलसचिव पुरभा काळे, नियंत्रक प्रवीण निर्मळ, विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, इतर जिल्ह्यातील पतंजली भारत स्वाभिमान न्यासचे पदाधिकारी आणि प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *