या दिवशी पासून राज्यातील या जिल्हा मध्ये होणार मुसळधार पाऊस musaldhar paus
musaldhar paus महाराष्ट्रात यंदाचा मान्सून वेळेआधीच दाखल झाला असला तरी, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची स्थिती भिन्न आहे. विशेषतः विदर्भ आणि नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असून, शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी महाराष्ट्रात मान्सून वेळेआधीच आला, ज्यामुळे शेतकऱ्यांसह साऱ्या जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. हवामान खात्याने यंदा चांगला मानसून राहणार असा अंदाज दिला होता, जो राज्याच्या मुख्य भूमीत वेळेआधी आगमन झाल्यानंतर खरा ठरला. गेल्या वर्षीसारखी दुष्काळी परिस्थिती यंदा राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
मात्र, विदर्भासाठी मान्सून आत्तापर्यंत समाधानकारक राहिला नाही ही गोष्ट चिंताजनक आहे. विदर्भात यावर्षी मान्सूनचे आगमन थोडेसे उशिराने झाले असून, विशेषतः नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे.
नागपूरात या वर्षी तब्बल आठ दिवस उशिराने मानसून दाखल झाला. परंतु मान्सून दाखल होऊनही अद्याप जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात जोरदार पावसाला कधीपासून सुरुवात होणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सध्या नागपुर जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण नाही. नागपूर जिल्ह्यात तब्बल 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार नाही असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मात्र 15 जुलै नंतर मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंगालच्या उपसागरात पावसासाठी स्ट्रॉंग सिस्टम तयार होत नसल्याने नागपूरसह विदर्भात पावसाचा जोर वाढत नाही. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी म्हटल्याप्रमाणे 12 ते 15 जुलै पर्यंत मात्र अशी परिस्थिती तयार होणार आहे की नागपूर जिल्हासह विदर्भात पावसाचा जोर वाढेल.
बंगालच्या उपसागरात परिसंचरण प्रणाली विकसित झाल्यानंतर नागपूरसहित मध्य भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत, स्थानिक हवामानामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षेचे दिवस
नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसाची वाट पाहावी लागणार असल्याने, शेतकऱ्यांना धीर धरावा लागणार आहे. या काळात पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन यांकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.