राज्यात दमदार पावसाची शक्यता
मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने पुनरागमन केले आहे. आज (ता. १५) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, कोकण आणि घाटमाथ्यासह, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, राजस्थानच्या बिकानेर पासून नर्नूल, दामेली, लखनऊ, देहरी, रांची, बालासोर ते पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहेउत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमशान केले आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर असलेल्या ताम्हिणी येथे तब्बल ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर बऱ्याच ठिकाणी २०० मिलीमीटरपेक्षा अधिक तर अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात हलक्या ते जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.आज (ता. १५) कोकणातील रत्नागिरी मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आहे. राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार सरींचा अंदाज आहे.
भारतीय केळीसाठी जागतिक बाजारात वाढती संधी
➖➖➖
*मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :* 🔴
रत्नागिरी.
*जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :*🟠
रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा.
*जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :*🟡
पालघर, ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी, धाराशिव, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली.
*विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)* :🟡
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, जालना, बीड, नागपूर, भंडारा, गोंदिया.
रविवार ( ता.14 जुलै ) रोजी जाहीर केलेल्या 15 जुलै साठी बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव