Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात 17 बळी; 15 हजार शेतकरी बाधित, 26 तासांपेक्षा अधिक काळ बत्तीगुल
मराठवाड्यात (Marathawada Unseasonal Rain) एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तब्बल 853 गावांना फटका बसला आहे. यामुळे येथील 15 हजार शेतकऱ्यांचे आठ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधीत झाली आहे. शिवाय वीज पडून तब्बल 17 जणांचा मृत्यू आणि 32 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्तालयाच्या वतीने व्यक्त (Marathawada Unseasonal Rain) करण्यात आला आहे.
मराठवाड्यात 9 ते 21 एप्रिल या तेरा दिवसात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात अनेक तालुक्यांमध्ये गारपिट झाली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालं, तर 602 घरांची पडझड (Marathawada Rain) झाली. शिवाय लहान-मोठी 280 जनावरे देखील दगावली (Farmers Affected) आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी सुमारे 20 मिनिट झालेल्या वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने (Unseasonal Rain) शहरातील नागरिकांसह महावितरणालाही चांगलाच घाम फोडला (Chhatrapati Sambhajinagar Unseasonal Rain) आहे. शहरातील अनेक भागात विद्युत खांब आणि तारा तुटल्या आहेत. यामुळे महावितरणला सुमारे 1 कोटी 70 लाखांचे नुकसान सहन करावा लागले. 9 एप्रिलपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक माणसे आणि जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
या अवकाळी पावसामुळे महावितरणाची चांगलीच दानादान उडाली (Crop Destroyed) आहे. देखभाल आणि दुरुस्तीचे पितळ 20 मिनिटात उघडे पडले आहे. त्यामुळे पूर्ण शहर अंधारात बुडाल्याने महावितरण बरोबरच नागरिकांनाही घामाघुम व्हावे लागले. दरम्यान यामुळे शहरातील 27 पैकी 13 सबस्टेशन बंद आहे. गारखेडा, पुंडलिकनगर यासारख्या काही भागांत 26 तासापेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित (Power Supply Interrupted) झाला होता. पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यातील 481 गावांतील 450 घरांचे नुकसान झाल्याचं समोर आलं होतं.