मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांना काय होणार परिणाम?

मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांना काय होणार परिणाम?

  1. RBI Restrictions on Kotak Mahindra Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोटक महिंद्रा बँकेवर कारवाईचा बडगा उगारत अनेक निर्बंध लादले आहेत.

कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांना कसा बसणार फटका?

कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांना कसा बसणार फटका? (REUTERS)

RBI Restrictions on Kotak Mahindra Bank : उल्हासनगरमधील कोणार्क अर्बन सहकारी बँकेवरील कारवाईची बातमी ताजी असतानाच आणखी एका बँकेवरील निर्बंधांची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोटक महिंद्रा या आघाडीच्या बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयनं कोटक बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे.

 

२०२२ आणि २०२३ च्या इन्कम टॅक्सच्या तपासणीत काही त्रुटी समोर आल्यामुळं १९४९ च्या बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ अ अंतर्गत कारवाई कोटक बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयला आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच मॅनेजमेंट, युजर अ‍ॅक्सेस, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डिझास्टर रिकव्हरीमध्ये काही गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

आरबीआय म्हणते…

कोटक महिंद्रा  बँक सलग दोन वर्षे बँकेच्या आयटी रिस्क आणि सिक्युरिट व्यवस्थापनात त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यातही बँकेला अपयश आलं आहे. गेल्या दोन वर्षांत कोअर बँकिंग सिस्टीम आणि डिजिटल चॅनेल्समध्ये वारंवार आणि लक्षणीय घोळ दिसून आला आहे. रिझर्व्ह बँकेशी वरिष्ठ पातळीवर संबंध असूनही आवश्यक सुधारणा करण्यात बँकेला अपयश आलं आहे. क्रेडिट कार्डशी संबंधित व्यवहारांसह डिजिटल व्यवहारांमध्ये वेगानं झालेल्या वाढीमुळं बँकेच्या आयटी सिस्टमवरील बोजा वाढला आहे, असंही आरबीआयनं नमूद केलं आहे. ग्राहकांच्या हितासाठी आणि भविष्यातील दीर्घकालीन परिणाम रोखण्यासाठी बँकेवर निर्बंध घातले आहेत.

तुम्ही कोटक बँकेचे ग्राहक आहात? मग इकडं लक्ष द्या!

आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेला आपल्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास व नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास मनाई केली आहे. विद्यमान ग्राहकांवर याचा फारसा परिणाम होणार नाही. क्रेडिट कार्डधारकांसह विद्यमान ग्राहकांसाठी बँकेच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. सर्वसमावेशक लेखापरीक्षण आणि इन्कम टॅक्समध्ये आढळलेल्या त्रुटी दूर केल्यानंतर आरबीआयकडून बँकेवरील व्यावसायिक निर्बंधांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

https://livenews456.com/https-livenews456-com-p374previewtrue/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *