LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

LPG Gas cylinder price : देशात सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. व्यावसाईक गॅस सिलेंडरच्या किमीत कमी झाल्या आहेत.

निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती? (PTI)

LPG Price 1 May: देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. आज बुधवार पासून एलपीजी सिलिंडरचे दर १९ रुपयांनी कमी झाले आहेत. केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या किमतीत सध्या जैसे थे आहेत.

आयओसीनुसार १ मे पासून म्हणजेच आजपासून दिल्लीत १९ किलोचा इंडेन एलपीजी सिलेंडर १७६४.५० रुपयांऐवजी १७४५.५० रुपयांना मिळणार आहे. मार्चमध्ये या सिलेंडरची किंमत ही १७९५ ऐवढी होती. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडर हा १८७९ रुपयांऐवजी १८५९ रुपयांना मिळणार आहे. या ठिकाणी एलपीजीचे दर २० रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईत १७१७.५० रुपयांऐवजी १६९८.५० रुपयांना व्यावसायिक सिलेंडर मिळणार आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १९३० रुपयांऐवजी १९११ रुपयांना मिळणार आहे.

आग्रा ते आगरतळा आणि काश्मीर ते कन्याकुमारी या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. लखनऊमध्ये आज घरगुती एलपीजी सिलिंडर ८४०.५ रुपयांना मिळणार आहे. जयपूर, राजस्थानमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर ८०६.५० रुपये आहे.

गुरुग्राममध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ८११.५० रुपयांवर स्थिर आहे. लुधियाना, पंजाबमध्ये घरगुती सिलिंडरचा दर ८२९ रुपये आहे. पाटणा, बिहारमध्ये घरगुती सिलिंडर जुन्या ९०१ रुपयांना मिळणार आहे.

कधी कमी झाले होते भाव?

यापूर्वी महिला दिनी मोदी सरकारने घरगुती सिलिंडरच्या ग्राहकांना मोठी भेट दिली होती. या दिवशी सहा महिन्यांत दुसऱ्यांदा एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली.

रक्षाबंधनाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केल्यानंतर सरकारने मार्चमध्ये घरगुती सिलिंडरचे दर १०० रुपयांनी कमी केले. दिल्लीत १४ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ८०३ रुपये झाली आहे. आजही याच दराने सिलेंडर मिळतो.

दर महिन्याला होतो बदल

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला घरगुती आणि कर्मशियल गॅस सिलिंडरचे दर बदलतात. मागच्या महिन्यात कर्मशियल गॅस सिलिंडरचे दर बदलले होते. मागच्या वेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. देशातील काही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली असल्याने व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे.

LPG Cylinder Expiry Date: गैस सिलेंडर की भी होती है एक्सपायरी डेट, ऐसे करें चेक; जरा सी चूक और जान जाने का खतरा

Beautiful Villages Of India: भारत के ये खूबसूरत गांव आपका मन मोह लेंगे, ये रही पूरी लिस्ट

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *