कचऱ्याचं खत, लस्सीचा स्प्रे वापरून या महिलेनं गच्चीवर फुलवली ऑरगॅनिक बाग; YouTube ला बनवलं गुरू
एका सर्वसामान्य महिलेने चक्क YouTube ला गुरू मानून घराच्या गच्चीवर इतकं सुंदर किचन गार्डन बनवलं आहे की भल्या भल्या शेतकऱ्यांनाही आश्चर्य वाटतंय. तिथे फक्त भाज्याच नाही तर स्ट्रॉबेरीही पिकवली आहे.
कचऱ्याचं खत, लस्सीचा स्प्रे वापरून या महिलेनं गच्चीवर फुलवली ऑरगॅनिक बाग; YouTube ला बनवलं गुरू
आजकाल सेंद्रिय शेतीला (Organic Farming on terrace) सर्वत्र प्रोत्साहन दिलं जात आहे. रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या अतिरेकी वापरानं फळं, भाजीपाला हे अत्यंत घातक सिद्ध होत आहेत. त्यामुळं आरोग्यासाठी आपल्या आहारात विषमुक्त पदार्थांचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. यातूनच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळालं असून, आजकाल मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय उत्पादनं घेतली जात आहेत. सर्वसामान्य लोकांमध्येदेखील याबाबत जागरूकता वाढत असून, अनेक लोक घरच्याघरी सेंद्रिय भाजीपाला (Organic Vegetables) पिकवत आहेत. त्यासाठी ऑनलाइन व्हिडिओची मदत घेतली जात आहे. अशाच एका सर्वसामान्य महिलेने चक्क YouTube ला गुरू मानून घराच्या गच्चीवर इतकं सुंदर किचन गार्डन बनवलं आहे की भल्या भल्या शेतकऱ्यांनाही आश्चर्य वाटतंय. या महिलेने फक्त कोबी, मिरची, लिंबं अशा भाज्याच नाही तर स्ट्रॉबेरीही छतावर पिकवली आहे. या जागरूक आणि उत्साही शेतकरी महिला आहेत पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यातील कस्बा खमाणो इथल्या रजनी भारद्वाज. त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच (Terrace gardening tips) सेंद्रिय शेती फुलवली असून, त्या भाज्या, फळं, फुलांचे उत्पादन घेत आहेत. गेली पाच वर्षे त्या ही शेती करत असून, आता त्यांच्या शेतीत भरभरून पिकं येत आहेत. त्यांच्यासह त्यांचे नातेवाईक, शेजारी यांनाही या विषमुक्त भाजीपाल्याचा आस्वाद घेता येत आहे. विशेष म्हणजे रजनी यांनी यासाठी कुठेही जाऊन खास प्रशिक्षण घेतलेलं नाही, तर यु ट्यूबवरून (You Tube terrace garden) माहिती घेऊन त्यांनी सेंद्रिय शेती केली आहे. याबद्दलची बातमी दैनिक जागरणने दिली आहे. 1700 चौरस फूट जागेवर त्यांनी ही शेती फुलवली असून, त्यांच्या या गच्चीवरच्या शेतीत मटार, घोसाळे, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, सिमला मिरची, लिंबू यासह आता स्ट्रॉबेरी ही आली आहे. रजनी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आता परदेशी भाज्याही पिकवायला सुरुवात केली आहे. यामध्ये ब्रोकोली, झुकीनी आदींचा समावेश आहे. रजनी यांनी सुरुवात केली तेव्हा त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करत, पण अनेकदा त्यात बियाणं वाया जात असे. सुरुवातीचे काही महिने असाच अनुभव आल्यानंतरही रजनी यांनी आपली हिंमत खचू दिली नाही. त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ बघून माहिती घ्यायला सुरुवात केली आणि प्रयोग करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना यश मिळू लागलं. आता त्या शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात. या शेतीसाठी लागणारे खत हे त्यांच्या स्वयंपाकघरातील ओला कचरा जिरवून केलेलं असतं. हे खत तयार होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो. तसंच चार-पाच दिवसा शिळी लस्सी अगदी आंबट झाल्यावर त्याचा स्प्रे भाजीपाल्यांच्या झाडांवर फवरला जातो. त्यामुळं उत्पादन चांगलं येत असल्याचं रजनी यांचे निरीक्षण आहे. चुलबुल पांडे जेव्हा भाजी विकतो…; भाजीवाल्या पांडेजीचा हटके VIDEO व्हायरल रजनी यांचा उत्साह आणि जिद्द बघून त्यांचे पती राजीव यांनीही त्यांना मदत करायला सुरुवात केली. आता तेही लोकांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित करतात. रजनी यांचा 15 वर्षांचा मुलगा प्रभ हादेखील शेतीसाठी त्यांना मदत करतो. रोज झाडांना पाणी देण्याचं काम करतो. रजनी आणि राजीव हे व्यावसयिक असून बंदेशा रोडवर त्यांचे एक ब्युटीक (Butic) आहे. आताही त्या ब्यूटिक सांभाळून रोज चार तास सेंद्रिय शेती करतात. एकदा ब्युटिकमध्ये आलेल्या शेतकऱ्यानं रजनी यांना एका रात्रीत उगवणाऱ्या वांग्याच्या पिकाविषयी आणि त्यावर मारल्या जाणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांविषयी सांगितलं. त्याचवेळी रजनी यांनी ठरवलं की आपण आपल्या घरासाठी आता विषमुक्त सेंद्रिय भाज्या पिकवायच्या. त्यासाठी शेतजमीन भाडेतत्वावर घेण्याचा त्यांचा विचार होता; पण युट्यूबवर त्यांना गच्चीवर शेती करण्याबाबत माहिती मिळाली आणि रजनी भारद्वाज यांच्या गच्चीवरील सेंद्रिय शेतीची पायाभरणी त्यांच्या घराच्या गच्चीवर झाली. कोरोना काळात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल?; वाचा हे सोपे उपाय आता त्यांची संपूर्ण गच्ची निरनिराळ्या प्रकारच्या भाज्यांनी हिरवीगार झाली आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या ब्युटिकमध्ये काम करणाऱ्या लवली हिनंही आपल्या घरी सेंद्रिय शेती सुरू केली आहे. रजनी भारद्वाज यांच्या सेंद्रिय शेतीतील कामाची दखल खमाणो नगरपालिकेनंही (Khamano Municipality) घेतली असून त्यांना स्वच्छता अभियानाअंतर्गत पुरस्कार देण्यात आला आहे.
वाचा.
Organic Farming : प्रत्येक तालुक्यांत होणार सेंद्रिय शेतीचे क्लस्टर