औरंगाबादमध्ये विषमुक्त गहू उत्पादन अभियान

औरंगाबादमध्ये विषमुक्त गहू उत्पादन अभियान

औरंगाबाद : कृषी विभाग जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे चालू रब्बी हंगामात सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त गहू उत्पादन अभियान राबविण्यात येणार आहे.
Non-toxic wheat production campaign in Aurangabad

औरंगाबाद : कृषी विभाग जिल्हा परिषद औरंगाबादतर्फे चालू रब्बी हंगामात सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त गहू उत्पादन अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती एल.जी. गायकवाड यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार ‘उत्पादक ते ग्राहक’ या तत्त्वावर जिल्ह्यातील सेंद्रिय गहू उत्पादक शेतकरी व ग्राहक म्हणून जिल्हा परिषदेत काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जोडणे या अभियानात अपेक्षित आहे.

पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व टप्प्यांवर कृषी विभागामार्फत पर्यवेक्षण करण्यात येईल. या बरोबरच जिल्हास्तरावर जि. प. पदाधिकारी, अधिकारी व पाच प्रगतिशील शेतकऱ्यांचा अंतर्भाव असणारी जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती कार्यरत राहील. पीक पेरणीपासून ते पीक वाढीचे कोणत्याही टप्प्यावर रासायनिक खत व रासायनिक किटकशाके, बुरशीनाशके वा तणनाशकांचा वापर करण्यास परवानगी असणार नाही. उत्पादक शेतकऱ्यांच्या तीने उत्पादित गहू हा सेंद्रिय असल्याची हमी कृषी विभागामार्फत ग्राहकांना देण्यात येणार आहे.

कृषी शेतकरी गटाचा विषमुक्त सेन्द्रीय शेतीचा वापर.

अभियानात उत्पादित गहू हा सेंद्रिय शेती पद्धतींचा अवलंब करून पिकविलेला आहे, याचे प्रमाणीकरण करण्यासाठी तालुकास्तरावर समिती नियुक्त करण्यात येईल. शेतकऱ्यांनी तालुका मुख्यालयात ग्राहकांच्या मागणीनुसार स्वखर्चाने पोच करणे बंधनकारक आहे. सेंद्रिय पद्धतीने गहू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आत्मा अंतर्गत गटाची नोंदणी केल्यास गटास गहू निःशुल्क वा नाममात्र भाड्यावर जागा देणे अपेक्षित आहे. गव्हाचा दर कमाल ३५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत राहील.

या आहेत अटी शर्ती

1.  कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
2. शेतकऱ्यांनी गव्हाचा जीडब्लू ४९६ (GW496) वाणाची लागवड करणे बंधनकारक.
3. बियाणे व इतर लागवड खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावयाचा आहे.
4. किमान १ एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने गहू लागवड बंधनकारक.
5. कृषी विभाग, जिल्हा परिषदेसोबत सामंजस्य करार (एमओयू) करणे बंधनकारक
जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने गहू उत्पादन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या अभियानात अटी व शर्तींचे पालन करून सहभाग नोंदवावा. – पी. आर. देशमुख, जि. प. कृषी विकास अधिकारी, औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *