PM Kisan Yojana : कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा १७ हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार

PM Kisan Yojana 17th installment : पीएम किसान लाभार्थ्यांसाठी नव्या सरकारने खुशखबरी दिली आहे. पुढील आठवड्यात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ वा हप्ता जमा होणार आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ११०  मुस्लिम खासदार निवडून आले?

PM Kisan Yojana 17th installment : पीएम किसान लाभार्थ्यांसाठी सरकारने खुशखबरी दिली आहे. या योजनेचा १७ वा हप्ता पुढील आठवड्यात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. वास्तविक, सरकारने पीएम किसानचा १७ वा हप्ता देण्याची तारीख निश्चित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात १८ जून रोजी बनारसमधून पीएम किसान योजनेच्या रकमेचे वितरण करणार आहेत. या अंतर्गत, देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना अंदाजे २० हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाईल.

काय योजना आहे?

पीएम किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठी लाभार्थी योजना (डीबीटी) योजना आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकरी या योजनेंतर्गत मिळालेल्या ६ हजार रुपयांची रक्कम खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादी त्यांच्या शेतीच्या गरजा खरेदी करण्यासाठी वापरू शकतात आणि कृषी क्षेत्रातील त्यांचा खर्च कमी करू शकतात तसेच अधिक नफा देखील मिळवू शकतात.

मोदींनी पंतप्रधान होताच स्वाक्षरी केली होती

सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या योजनेच्या फाईलवर सही केली होती. पीएम किसान निधीच्या १७ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान म्हणाले की, नवीन सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती आपली बांधिलकी दर्शवतो व आगामी काळात सरकारला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काही करत राहायचे आहे. रविवारी संध्याकाळी मोदींनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

१ डिसेंबर २०१८ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते. प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता, परंतु आता देशातील सर्व शेतकरी पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

किसान सन्मान निधीचे आतापर्यंत १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत. १६ वा हप्ता पीम मोदी यांनी यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी ९.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. पीएम-किसानचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०९ कोटी शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक २.०३ कोटी शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (८९.६६ लाख), मध्य प्रदेश (७९.३९ लाख), बिहार (७५.७९ लाख) आणि राजस्थान (७५.७९ लाख) आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची सोमवारी सायंकाळी ५ वाजता पहिली बैठक होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *