विषमुक्त गहु घ्या.
शेतकरी बंधुनो ह्या वर्षी पाऊस चांगला झाल्या मुळे पाणी मुबलक आहे शेतकरी खाण्या साठी गहु पेरणार पण तो विषमुक्त घ्यावा
जेणेकरून आपले कुटुंब आजार मुक्त व्हावे थोडे उत्पन्न कमी मिळेल त्याची भर दुसरीकडे काढता येईल
खालील अवलंब करावा.
मका निघाले वर कडब्या ची कुट्टी करावी ती पेरणी क्षेत्रात पसरावी
नांगरटी मध्ये गाडावी धस काडी जाळु नये रोटावहेटर द्वारा तुकडे होतात लवकर कुजतात रान तयार झाले वर अजित 102 सारखे चांगले वाण निवडुन जिवाणू कल्चर बिजप्रक्रीया करुन पेरणी करावी पेरतांना कोणतेच रासायनिक खत पेरु नये
त्या ऐवजी एकरी 30/40 किलो गांडुळ खतात 750 ग्रॅम ब्लुग्रीन अल्गी एकत्र करून पाणी देण्याचे आधी फेकावे गांडुळे तयार होऊन मका कुटार खाद्य मिळाल्याने सेंद्रीय कर्बाचे प्रमाणे वाढेल जिवाणू ची संख्या वाढुन जमिन सजीव राहील
ब्लुग्रीन अल्गी सेंद्रीय खता मुळे एकरी 1बॅग युरीया इतके नत्र, स्पुरद, पालाश मिळेल
जिवाणू कल्चर भुरक्षक पासुन डीकाॅमपोजर तयार करून पाण्यातून सोडावे
21 दिवसाचे पिक झाले वर कीटकनाशक, बुरशी नाशक,व्हारसनाशक पंचगव्य
LOM-C चे द्रावण तयार करून 15 लिटर मध्ये फक्त 15 मिली द्रावण टाकुन फवारणी करावी
पानांचा आकार मोठा होऊन मुगुटमुळे जास्त फुटतील दुसरा
पंचगव्य चा फवारा 42 दिवसांनी फवारावे कांडी धरून वाढीस लागेल तिसरा फवारा 70 दिवसांनी ओंबी पोटरीत असतांना
द्यावा नियमित पाणी द्या वे तण काढुन स्वछ ठेवावे तणनाशक फवारणी करु नये त्या मुळे अंश झाडात दाण्यात येणार नाही
गांडुळ खत 15ते 20 रुपये किलो
मिळते एकरी 2000/-रुपये खर्च
ब्लुग्रीन अल्गी 750 ग्रॅम पावडर रुपये 650/- पंचगव्य
एकरी रुपये 120 /-(600रु पाॅ)
एकुण = 3250/-रुपये खर्च
रासायनिक खते, औषधी पेक्षा कमी खर्चात विषमुक्त गहु तयार होईल