रासायनिक खतांचा वापर टाळा आणि विषमुक्त शेती करा.

रासायनिक खतांचा वापर टाळा आणि विषमुक्त शेती करा.

Avoid the use of chemical fertilizers

रासायनिक खतांचा वापर टाळा आणि विषमुक्त शेती करा

वडगाव निंबाळकर – अलीकडच्या काळात पालेभाज्यासह फळे अन्नधान्याच्या पीकावर मोठ्या प्रमाणात औषधे मारली जात आहेत. याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत आहे. रासायनिक खतांचा वापर टाळा आणि विषमुक्त शेती करा यातून आपणासह इतरांचे आरोग्य चांगले राहील असा सल्ला पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलिप खैरे यांनी दिला.

विषमुक्त शेतीसाठी तरुण शेतकऱ्याचा प्रयोग

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठाणच्या वर्धापण दिनानिमित्त विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण व गुणगौरव समारंभ खैरे यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी सोमेश्र्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड, सदोबाचीवाडी सरपंच विलास होळकर उपसरपंच विनोद भोसले, माजी सरपंच सुनिल ढोले, धैर्यशील राजेनिंबाळकर, दुध संघाच्या संचालीका छाया दरेकर, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते. खैरे पुढे म्हणाले की एखादा उपक्रम सुरू होतो काय आणि पहाता पहाता आकरा वर्ष नियमित पणे चालतो काय ग्रामिण भागात हे चित्र नक्कीच कौतुकास्पद आहे. अशा शब्दात प्रतिष्ठाणच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी विविध पाच स्पर्धेतील विजेत्यांसह विषेश प्राविण्य मिळवणाऱ्या एकुण ४० मुलेमुली व महिला यांना स्मृती चिन्ह देउन गौरवण्यात आले. प्रस्ताविक चिंतामणी क्षीरसागर उपस्थितांचे स्वागत अमित निंबाळकर आभार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी मानले.

विषमुक्त आहार घ्यायचा असेल तर आधी माती विषमुक्त करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *