शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळत असून नागरिकांना विषमुक्त अन्न मिळण्यास मदत होत आहे व जमिनीचा पोत सुधारण्यासही फायदा होत आहे. केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. यामुळे जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहून जमिनीची सुपीकता वाढून आरोग्यास पोषक उत्पादनाची निर्मिती होते. धाराशिव जिल्ह्यात जवळपास ५३२ शेतकऱ्यांकडून ७०० एकरांवर सेंद्रिय उत्पादन घेतात. यामध्ये वाशी येथील विश्वास उंदरे यांनी २१ एकरांवर भाजीपाला, बाजरी, ज्वारी, आंबा, सेंद्रिय गुळ उत्पादित करून स्थानिक व परजिल्ह्यातील ग्राहकांना बस व कुरियरच्या माध्यमातून पुरवठा करतात.
सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला गुळ, पालेभाज्या, ज्वारी, फळ खरेदी करतो. सेंद्रिय अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार कमी होऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. -डॉ. राहुल बाराते, रा. वाशी.
विभाग गटसंख्या शेतकरी क्षेत्र हेक्टर
कोकण ७५ १९०० १५०० नाशिक ४५ ९६१ ९०० पुणे ४५ ९०० १२०० कोल्हापूर ४५ १०५८ ९०० संभाजीनगर १५ ४२४ २४९ लातूर ७५ १७०८ १५०० नागपूर ७५ १९०० १५०० अमरावती ६० १२०० २३०० एकूण ४३५ १००५१ १००४९
धाराशिवमध्ये १५ गटांद्वारे सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेतीसाठी तीन वर्षे रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर टाळल्यावरच प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी ७०० एकर जमिनीचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. -रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.