अशा पद्धतीने करा चिक्कू लागवड, चिकूची लागवड तंत्र
चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे.चिकू मध्ये आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहेत. चिकूचे वैशिष्ट म्हणजे भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच म्हटले जाते. चिकूपासून जॅम, स्क्वॅश, चिकूच्या फोडी हवाबंद करणे तसेच भुकटी हे पदार्थ तयार करता येतात.या लेखामध्ये आपण चिकूचे लागवडीविषयी माहिती घेणार आहोत.
चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे.चिकू मध्ये आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहेत. चिकूचे वैशिष्ट म्हणजे भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच म्हटले जाते. चिकूपासून जॅम, स्क्वॅश, चिकूच्या फोडी हवाबंद करणे तसेच भुकटी हे पदार्थ तयार करता येतात.या लेखामध्ये आपण चिकूचे लागवडीविषयी माहिती घेणार आहोत.
लागवडपद्धत- चिकूची लागवड प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करावी. लागवड करण्यापूर्वी जमिनीची नांगरणी व कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. दहा बाय दहा मीटर अंतरावर 1 मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. या खड्ड्यांमध्ये पोयटा माती, दोन ते तीन पाट्या शेनखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पावडर 200 ग्रॅम या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्यात कलम लावताना खड्ड्याच्या मध्यभागी कलमाचा जोड जमिनीच्या वर राहील या पद्धतीने लावावे. कला बावल्या तर कलमाला काठीचा आधार द्यावा लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.
झाडाची नियमित छाटणी करावी लागत नाही. मात्र सुरवातीच्या काळात खिरणी खुंटावर येणारी फोटो तसेच झाडाच्या खोडावर जमिनीपासून 50 सेंटिमीटर उंचीपर्यंत येणारे नवीन फूट वेळोवेळी काढून टाकावे. झाडाला योग्य आकार देण्यासाठी आवश्यकतेनुसार छाटणी करावी.
चिकूचेजलद वाढ होण्यासाठी खताच्या मात्रा दोनसमान टप्प्यात विभागून द्यावे. साधारणतः सप्टेंबर आणि जून या महिन्यात खतमात्रा द्याव्यात. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना शंभर किलो शेणखत, तीन किलो नत्र, दोन किलो स्फुरद व दोन किलो पालाश द्यावे.
झाडांची चांगली वाढ आणि त्यापासून भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी पाण्याचा नियमित पाळा द्याव्यात.
झाडाच्या फुलोरा धरण्याच्या काळात तसेच फळधारणेच्या अवस्थेत चिकूच्या झाडाला पाण्याचा ताण पडल्यास फळांचा आकार लहान राहतो.
चिकू मध्ये घेता येतात आंतरपिके
चिकूच्या झाडाची वाढ सावकाश होते त्यामुळे अगोदरच्या पाच ते सहा वर्षाच्या काळात त्यामध्ये आंतरपिके घ्यावीत.
चिकू मध्ये टोमॅटो,कोबी, वांगी,मिरची,लिली, निशिगंध आंतरपिकांची लागवड फायदेशीर ठरते.
फुलांचा पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये येतो. दुसरा बहार फेब्रुवारी-मार्चमध्ये येतो. साधारण पाणी फुले आल्यानंतर फळधारणा होऊन फळे पक्व होण्यासाठी 240 ते 270 दिवसांचा कालावधी लागतो.
कालीपत्ती, क्रिकेट बॉल,कीर्ती भारती, को1,पिली पत्ती, बारमासी, पी के एम 7, पी के एम 2 या चिकूच्या प्रसिद्ध जाती आहेत.
कालीपत्ती ही लोकप्रिय जात आहे.या जातीची झाडे मोठी, विस्तारित असतात.पाने गर्द हिरवी असतात. फळे मोठी अंडाकृती असतात तर गर गोड आहे.पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून दरवर्षी तीन हजार ते चार हजार फळे मिळतात.
जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय, विषमुक्त, शेती करण्याचे फायदे व रासायनिक का नको….? ह्याबद्दलची 50 कारणे