मान्सून पुन्हा जोर धरणार! पुढील 5 दिवस महत्त्वाचे, राज्याच्या या भागांत जोरदार बरसणार

Monsoon Update 21st June : मागील 3-4 दिवसात राज्यात मान्सून मंदावला होता. आता मात्र मान्सून जोर धरणार असून अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना खोळंबलेल्या पेरण्याही आता पूर्ण करता येणार आहेत

News18

पुढील 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम विद्रभात आठवडाभराहून अधिक काळ मान्सून रेंगाळला होता. आता हा मान्सून पूर्व विदर्भातही हजेरी लावत आहे.
News18
अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेनंही जोर पकडला आहे. परिणामी, पुढील तीन दिवस कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
News18
तर, मध्य महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील आठ दिवसांपासून मान्सूनच्या वाटचालीत काहीही प्रगती नव्हती
News18आता मात्र मान्सून जोर धरणार असून अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना खोळंबलेल्या पेरण्याही आता पूर्ण करता येणार आहेत
News18पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. इथे विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्ययासह मुसळधार पाऊस हजेरी लावेल.
News18दरम्यान आजही कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
News18
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यभर आजपासून पावसाची हजेरी ? जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची स्थिती !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *