Crop Insurance : फळपीकविमा २०२४ चा विमा 

Crop Insurance : फळपीकविमा २०२४ चा विमा

Crop Insurance Scheme : शासनाने हवामान आधारित पिक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२४ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, चिकू , लिंबू, सिताफळ, द्राक्ष या ८ फळपिकांसाठी विमा भरण्यास सुरुवात झाली आहे.

Crop Insurance

Pune News : शासनाने हवामान आधारित पिक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२४  मध्ये  संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, चिकू , लिंबू, सिताफळ, द्राक्ष  या ८ फळपिकांसाठी विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसुल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अश्या महसुल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसुचित करण्यात येवून तेथे ही योजना राबविण्यात येते. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू राहणार आहे.

या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर  विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात.

फळ पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी नुकतीच लागवड केलेले शेतकरी पात्र नसतील. त्यासाठी त्या फळपिकाचे उत्पादनक्षम वय वर्ष ठरविलेले आहे. यात डाळिंब आणि द्राक्षाचे उत्पादनक्षम वय २ वर्षे आहे. म्हणजेच किमान २ वर्षांची बाग असावी. संत्रा, मोसंबी, पेरून आणि सिताफळाचे उत्पादनक्षम वय ३ वर्षे आहे. लिंबू ४ वर्षे आणि आंबा, चिकू तसेच काजूचे उत्पादनक्षम वय ५ वर्षे आहे. म्हणजेच आपण ज्या पिकाची फळबाग लावली आहे त्या पिकाचे वय शासनाने निश्चित केल्याप्रमाणे असेल तरच आपल्याला फळपीक विमा योजनेत भाग घेता येईल.

सोमवार (ता.24 जून) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

हवामान आधारित फळपीक विमा योजनेत यंदा चार कंपन्या आहेत. या कंपन्यांकडे राज्यातील जिल्हे आहेत. जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग,  कोल्हापुर, वर्धा, रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड ही कंपनी आहे. तसेच जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. ही कंपनी आहे.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं. लि. ही कंपनी फळपीक विमा योजना राबविणार आहे. ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातुर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम या जल्ह्यांमध्ये बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी फळपीक विमा योजना राबविणार आहे, अशी माहीत कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *