Weather forecast ;राज्याच्या या भागात पावसाची शक्यता कमी ; हवामान विभागाचा अंदाज…
Weather forecast ;राज्याच्या या भागात पावसाची शक्यता कमी ; हवामान विभागाचा अंदाज…
सध्या अरबी समुद्रात उंचावर हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रावार वाऱ्याच्या स्थितीमुळे मुंबई सह उत्तर महाराष्ट्रा पर्यत पुर्व पश्चिम वाऱ्याच्या संगम होत असल्यामुळे मुंबई च्या जवळपास पाउस वाढलेला नाही. दक्षिण कोकण किनारपट्टी पर्यत वेगवान वारे पोहचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे केवळ ते कर्नाटक किनाऱ्यावर जोरदार पाऊस होतोय.
सध्या सिंधुदुर्ग च्या काही भागात हलक्या पावसाचे ढग आहेत येत्या 24 तासात सिंधुदुर्ग आणि गोव्यात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर च्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सध्या मान्सून वारे कमकुवत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील अंतर्गत भागात होताना दिसतोय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण उत्तर महाराष्ट्रातील काही भाग व विदर्भात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्या तुलनेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस होईल.
राज्यभरात आज जोरदार पावसाचा इशारा; खान्देशात कशी असेल स्थिती ?
आज हवामान विभागाने नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट दिला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे व जळगाव, नगर, सांगली, सोलापूर व संपूर्ण मराठवाड्यात ग्रिन अलर्ट असुन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.