Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर वाढणार जोर

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर वाढणार जोर

Rain News : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

Rain Forecast

Pune News : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २९) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणाच्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तसेच पूर्व विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे सर्वाधिक १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, राज्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे.

Annapurna Yojana: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती सिलिंडर मोफत मिळणार?

कमी दाबाचे क्षेत्र, महाराष्ट्रात असलेले जोड क्षेत्र, किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि गुजरातमधील चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण आणि घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २९) कोकणातील रायगड, रत्नागिरी सह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणाली पासून राजस्थानातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्राचा मध्यभागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राजधानी दिल्ली मॉन्सूनच्या छायेत

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल करत उत्तरेकडे चाल करत आहेत. गुरूवारी (ता. २७) गुजरातसह देशाचा हिमालयाकडील भाग व्यापणाऱ्या मॉन्सूनने शुक्रवारी आणखी प्रगती केली आहे. राजधानी दिल्लीसह, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तराखंड या राज्यांचा संपूर्ण भाग, राजस्थान, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग मॉन्सूनच्या छायेत आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.

कोकण :

म्हसळा, तळा प्रत्येकी १४०, श्रीवर्धन, रामेश्वर, उरण प्रत्येकी ११०, मंडणगड १००, सावंतवाडी, दापोली, मुरूड, लांजा, गुहाघर प्रत्येकी ९०, कुडाळ, वेंगुर्ला, मुलदे, वाकवली, कुलाबा, ठाणे, पनवेल प्रत्येकी ८०, मालवण, रोहा, हर्णे, सांताक्रुझ प्रत्येकी ७०, सुधागड पाली, संगमेश्वर, खेड, राजापूर, देवगड, रत्नागिरी प्रत्येकी ६०, कणकवली, दोडामार्ग, सावर्डे, भिवंडी, चिपळूण, माथेरान, आवळेगाव, तलासरी, महाड, पेण प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र :

गगनबावडा ७०, पाचोरा ६०, राधानगरी ५०, महाबळेश्वर, इगतपुरी, धरणगाव प्रत्येकी ४०, एरंडोल, चंदगड, जळगाव, वेल्हे, यावल, रावेर प्रत्येकी ३०, नंदूरबार, शाहूवाडी, सिंदखेडा, धुळे, चाळीसगाव, चोपडा प्रत्येकी २०.

मराठवाडा :

धालेगाव ३०, माहूर, अर्धापूर, सोयगाव, किनवट प्रत्येकी २०.

विदर्भ :

जेवती १७०, भामरागड ११०, मूल, बल्लारपूर प्रत्येकी ८०, राजूरा, चंद्रपूर, चिमूर, सावळी प्रत्येकी ७०, कोर्पणा, यवतमाळ, चामोर्शी, उमरेड, आमगाव प्रत्येकी ६०, कुही, कामठी, भिवापूर, सिंदेवाही, गोंड पिंपरी प्रत्येकी ५०.

घाटमाथा :

ताम्हिणी १५०, आंबोणे ११०, डुंगरवाडी ८०, भिरा, धारावी, शिरगाव प्रत्येकी ६०.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *