महाराष्ट्रातील ‘या’ 19 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट
Havaman Andaj 2024 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तथा नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मध्यंतरी पावसाने दडी मारली होती. राज्यातील अनेक भागांमध्ये मोसमी पावसाने काढता पाय घेतला होता.
जवळपास दहा ते बारा दिवस महाराष्ट्रात पावसाची विश्रांती होती आणि यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. परंतु गेल्या काही दिवसांपासून मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून याचा परिणाम म्हणून राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. कोकणात आणि घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे.
उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. दरम्यान हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील एकोणावीस जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आता आपण राज्यातील कोणत्या 19 जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज कोकणात आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आज हवामान खात्याने या संबंधित विभागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे.
याशिवाय आज उत्तर कोकणातील पालघर ठाणे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि राजधानी मुंबईतही चांगल्या पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तसेच आज पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भातील या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आज वादळी वारे वाहतील, विजांचा कडकडाट होईल आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.
Maharashtra Krishi Din : आज साजरा केला जातोय कृषी दिन जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व