Cultivation of chiku : आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने करा चिकू लागवड मिळेल भोरघोस उत्पादन.
१) चिकू फळबाग लागवड करण्यापूर्वी जमीनीची मशागत खालील दिलेल्या माहिती प्रमाणे केली जाते.
चिकू फळबाग लागवड करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते, परंतु शक्यतो पाणी निचरा होणारी जमीन निवडली पाहिजे, कारण चिक्कू च्या रोपांच्या मुळांना बुरशी चा संसर्ग कमी होतो.
चिकू फळबाग लागवड करताना उन्हाळ्यामध्येच जमीनीवर दोन बाय दोन फूट रुंद व खोल खड्डे खणून घ्यावे लागतात.
चिक्कू फळबाग लागवड करताना दोन झाडातील अंतर हे कमीत कमी 20 फूट असायला हवे व जास्तीत जास्त 25 फूट असायला हवे. कारण काही वर्षा नंतर झाडे ही मोठ मोठे होतात. जास्त अंतर ठेवल्यास चिक्कू फळबागेत हवा मोकळी खेळती राहते. व चिक्कू फळबाग जास्तीत जास्त वर्षे टिकून राहते.
चिक्कू फळबाग लागवडी साठी खणलेल्या खड्ड्यात दोन किलो शेणखत, दोन किलो शेंद्रीय खत व दोन किलो काळी माती टाकून खड्डे भरून घ्यावेत.
अशा प्रकारे चिक्कू फळबाग लागवडी पूर्वी मशागत करावी.
२) चिकू फळबाग लागवडी साठी जातीची निवड.
चिकू लागवडी साठी कोणत्याही जातीची रोपे रोपवाटिकामध्ये आपल्या पसंती नुसार मिळतात.
त्यामुळे आपल्याला कोणत्या जातीची रोपे योग्य वाटतात ते निवडावेत. कारण प्रत्येक शेतकऱ्याची पसंती अलग अलग असते. रोपवाटिकामध्ये नव नवीन सुधारित जातीची रोपे मिळतात. शेतकऱ्यांनी चिकूची रोपे निवडतांना मजबूत रोपे बघूनच घ्यावेत. कारण मजबूत चिकूची रोपे जमीनीत लवकरात लवकर सेट होतात.
३) चिकू फळबाग लागवडीसाठी रोपांची निवड व लागवड.
चिकू फळबाग लागवडीसाठी लहान मोठे रोपे रोपवाटिकामध्ये मिळतात. मोठे रोप जर घेतले तर चिकू झाडाला फळे लवकर लागतात. चिकू ची लहान रोपे लावले तर चिक्कू च्या झाडाला फळे उशिरा लागतात.
मोठे रोपे रोपवाटिकामध्ये महाग भेटतात पण फळे लवकर मिळतात म्हणून मोठे च चिक्कू ची रोपे शेतकऱ्यांना लावलेले परवडतात.
रोपे कोणतेही निवडा पण लागवड करताना खणलेल्या खड्ड्यात एक फूट खोल जमीनीत रोप लावावे व खड्ड्यात पाणी सोडावे. खड्डे पूर्ण ओले झाल्यावर पाणी बंद करावे.
पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे म्हणजे चिक्कू ची रोपे जमीनीत लवकर सेट होतात. चिक्कू च्या रोपांची काडी जर लवचिक असेल तर त्या चिक्कू च्या रोपांना रोपा एवढ्या उंच मजबूत न लवणाऱ्या काठ्या बांधून घ्याव्यात.
काठ्या बांधल्यामुळे कितीही मोठे वादळ आले तरी चिक्कू च्या रोपाचे काहीही नुकसान होणार नाही.
असे केल्याने जमीनीत रोपे लवकर सेट होतात.
४) चिकू फळबाग लागवडी चे पाणी व्यवस्थापन.
चिकू लागवड केलेल्या लाईन मध्ये चिक्कू च्या झाडाच्या दोन्ही बाजूंनी ठिबक सिंचनाचे पाईप अंथरून घ्यावेत.
चिक्कू लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे चिक्कू लहान रोपांना दोन चार दिवसाच्या अंतराने चार चार तास पाणी द्यावे. असे सहा महिने चिक्कू च्या रोपांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत राहावे.
सहा महिन्या नंतर पाण्याचे प्रमाण वाढवावे.
जसे जसे झाडे मोठे होत जातील तसे तसे पाण्याचे प्रमाण वाढवावे.
५) चिकू च्या फळबागेत अंतर पिके खालील प्रमाणे घेतली तरी चालतील.
चिकू ची रोपे लहान आहेत तोपर्यंत आंब्याच्या बागेत अंतर पिके म्हणून भाजीपाला पिके, टरबूज फळबाग, खरबूज फळबाग, मेथी ची भाजी, कोथिंबीर, स्ट्राबेरी फळबाग, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, हिरवी काकडी, फुलकोबी, पानकोबी, जिरे पिक, बडीशेप पिक, सफेद काकडी, कांदा, लसूण, दुधी भोपळा, काशी फळभोपळा, डांगर, भेंडी, गवार, झेंडूच्या फुलांची रोपे, सोयाबीन, कापूस, राजमा, हरभरा, भुईमूग, टोमॅटो, बटाटा, ज्वारी, बाजरी, जवस, हुलगा, अंबाडी, शेपा, मटकी, उडीद, मूग, वाटावा, गाजर अशा प्रकारचे अनेक व अणखीण काही चुकुन राहीले असलेले कमी कालावधीत निघणारी पिके ही अंतर पके म्हणून आंब्याच्या बागेत घेतली तरी चालतात.
चिकू फळबागेतील अंतर पिकामुळे चिकूला फळे लागे पर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल किंवा सुधारेल.
अशा प्रकारे चिकू फळबाग लागवड करणाऱ्या किंवा चिकू फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी अंतर पिके घेतली तर त्याना ताजा पैसा अंतर पिकाच्या उत्पन्नातून मिळेल.
६) चिकू फळबागेचे खत व्यवस्थापन.
* शेणखत.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिकू च्या रोपांच्या बाजुंनी बांगडी पध्दतीने शेणखत द्यावे.
* शेंद्रीय खते.
आता बाजार मध्ये सुधारित शेंद्रीय खते उपलब्ध आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सुधारित कंपनीचेच शेंद्रीय खत घ्यावे. चिक्कू च्या रोपांना शेंद्रीय खते प्रत्येक तीन महिन्याच्या अंतराने द्यावे. शेंद्रीय खते सुध्दा बांगडी पध्दतीने चिक्कू च्या रोपांना घालून घ्यावेत.
* रासायनिक खते.
शेणखत व शेंद्रीय खते वापरल्यास रासायनिक खतांची जास्त आवश्यकता नाही.
शेणखत व शेंद्रीय खते वापरल्यास मानवी जातीसाठी , प्राण्यांसाठी, जमीनीतील जीव जंतू साठी हानीकारक नाहीत.
रासायनिक खते चिक्कू च्या फळबागेसाठी वापरायचे असल्यास बाजारात भरपूर प्रकारचे खते मिळतात.
उदाहरणार्थ :-
10:26:26, 18:46:00, 12:32:16, 15:15:15,
युरिया, सुपर फाॅस्पेट , पोटॅश.
एक एकर चिक्कू फळबागेसाठी वरील पैकी प्रत्येकी एक एक 50 किलो पॅकिंग चे पोते घेऊन भेसळ डोस तयार करुन वर्षांत दोनदा दोन डोस दिले तरी चालतात.
७) चिकू फळबागेसाठी बुरशी नाशकांची निवड.
चिकू फळबागेची लागवड केल्यानंतर चार दिवसांनी रोको कंपनी चे किंवा ब्ल्यु काॅपर ही बुरशी नाशक किंवा आणखीन बाजारात मोठ्या प्रमाणात नामांकित कंपन्यांची बुरशी नाशक उपलब्ध आहेत ती ठिबक सिंचनाद्वारे सोडावीत.
महिन्यात एकदा तरी बुरशी नाशक ठिबक सिंचनाद्वारे सोडावे. म्हणजे चिकू च्या रोपांच्या मुळांना बुरशी लागणार नाही.
८) चिकू फळबागेसाठी किटक नाशक फवारणी.
चिकू च्या रोपांच्या मुळांना किटक लागु नयेत म्हणून ठिबक सिंचनाद्वारे किटक नाशक सोडावे लागते.
चिकू च्या झाडा वरील रोग पाहुन फवारणी चे प्रतिबंधात्मक उपाय केले जातात.
९) चिकू फळबागेचे वर्षीक उत्पन्न.
चिक्कू बाजारात 20,30,40 ₹ किलोने विकला जातो.
त्यामुळे वर्षाकाठी एक एकर जमिनीवर चिकूचे उत्पन्न हे चार ते पाच लाख रुपये पक्के मिळते.
१०) चिकू फळबाग लागवडी साठी शासकीय योजना.
फळबाग लागवडी साठी शासनाच्या नव नवीन योजना आहेत त्यामध्ये पण फळबाग लागवड करता येते.
राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; हवामान विभागाचा अंदाज