Monsoon Rain : काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचे संकेत; कोकण, मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
Weather Update : हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज दिला. पण राज्यात सर्वदूर पावसासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते, अशी शक्यता आहे.
Maharashtra : माॅन्सूनने आज संपूर्ण देश व्यापला आहे. तर देशातील अनेक भागात पाऊस पडत आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज दिला. पण राज्यात सर्वदूर पावसासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते, अशी शक्यता आहे.
माॅन्सूनने आज राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उर्वरित भाग व्यापत संपूर्ण देश व्यापला. माॅन्सूनने सरासरी तारखेच्या ६ दिवस आधीच देश व्यापला. माॅन्सून ट्रफ फिरोजपूर, रोहतक, हरदोल, बल्लीया, बलूरघाट, कैलाशहर आणि तिथून पूर्वकडे मनिपूरकडे आहे. पण अजूनही बहुतांशी भागात माॅन्सून म्हणावा तसा सक्रीय झालेला नाही.
राज्याच्या अनेक भागात पुढील ४ दिवस हलका, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज आणि उद्या कोकण तेसच मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, खानदेशातील नंदूरबार आणि विदर्भातील बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.
तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील.
Cultivation of chiku : आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने करा चिकू लागवड मिळेल भोरघोस उत्पादन.
उद्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक, विदर्भातील बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाडा, कोकण आणि खानेदशातील इतर भागात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरीचाही अंदाज दिला.”