पुढील 5 दिवस कसा राहणार मान्सून ? कुठे-कुठे बरसणार मुसळधार पाऊस ? हवामान खात्याचा अंदाज पहा
Havaman Andaj : मान्सूनचा पहिला महिना संपला आहे. दुसऱ्या महिन्याला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये राज्यातील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र काही ठिकाणी जून महिना संपला असला आणि जुलैची सुरुवात झाली असली तरी देखील मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा खऱ्या अर्थाने लपंडाव पाहायला मिळाला. कोकण आणि घाटमाथ्यावर नक्कीच जोरदार पाऊस झाला आहे यात शंकाच नाही. मात्र उर्वरित भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे धुळ पेरणी आणि पुरेशा ओलीवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
जुनच्या शेवटचा आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना नवसंजीवनी मिळाली. पण, तरीही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
बुधवार ( ता. 03 जुलै ) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
जुलैमध्ये चांगला जोरदार पाऊस होईल आणि खरिपातील पिकांना दिलासा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने जुलै च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील मराठवाडा विभागात गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो असेही हवामान खात्याने यावेळी स्पष्ट केले आहे.
खानदेश मधील धुळे, नंदुरबार, जळगाव अन मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या दहा जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता यावेळी ज्येष्ठ हवामान तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र यातील खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात जोरदार पावसाची शक्यता देखील नाकारून चालणार नाही असेही हवामान तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
गुरुवारपर्यंत कोकणात अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाबाबत बोलायचं झालं तर येथे गुरुवारपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर,भंडारा, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये या कालावधीत अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील नाकारून चालणार नाही असे देखील आयएमडी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हणजेच मराठवाडा विभाग वगळता राज्याच्या उर्वरित विभागांमध्ये गुरुवारपर्यंत चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो. यामुळे आता हवामान खात्याचा अंदाजानुसार पावसाचे आगमन होते का हे पाहण्यासारखे राहणार आहे.