जळगाव। ५ जुलै २०२४ । जळगावकरांसाठी पावसाबाबत महत्वाची बातमी आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला असला तरी अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या राज्यभरातील वातावरणानुसार जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
५ आणि ८ जुलै रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. तर ९ ते ११ जुलै या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल गुरुवारी (दि.४) जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.
गुरूवार ( ता. 04 जुलै ) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
जिल्ह्यात आतापर्यंत १८२ मिमी पाऊस झाला आहे. ५ जुलैपर्यंतच्या एकूण सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १२८ टक्के पाऊस झाला आहे.जून ते सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या पावसाच्या एकूण सरासरीच्या आतापर्यंत २० टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी जळगाव जिल्ह्यात मात्र आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या देखील ८० टक्क्यांपर्यंत झाल्या आहेत
जळगाव पडणार सरासरी इतका पाऊस?
दरम्यान, जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल. कुठे कुठे पाऊस पडणार? याबाबतची सविस्तर माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. त्यानुसार हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यांसह लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे 96 ते 104 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.