राज्यात पावसाचा जोर वाढणार ; जळगावसह या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पावसाचा जोर वाढणार ; जळगावसह या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

जळगाव । ७ जुलै २०२४ । जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शनिवारी दुपारनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान राज्यात आजपासून पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज रविवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.तर उद्या म्हणजेच सोमवारी कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यात दमदार पाऊस; पहिल्याच पावसात मध्य रेल्वेचे तीन तेरा

काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक धुळे आणि नंदुबार जिल्ह्यांत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईसह उपनगरात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *