Banana Market : खानदेशात केळी आवक स्थिर

Banana Market : खानदेशात केळी आवक स्थिर

Banana Rate : खानदेशात केळी आवक स्थिर असून, दरात किचित सुधारणा झाली आहे. शिवार खरेदीत केळीला कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या मिळत आहे.

Banana Market

Jalgaon News : खानदेशात केळी आवक स्थिर असून, दरात किचित सुधारणा झाली आहे. शिवार खरेदीत केळीला कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या मिळत आहे. दरात एक क्विंटलमागे ५० ते ६० रुपयांची सुधारणा झाली.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारात केळीची आवक घटली असून, तेथे रविवारी (ता. १५) २२५ ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) केळीची आवक झाली. तेथे जाहीर लिलावात किमान ११७५ रुपये आणि कमाल १७०१ रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीस मिळाला. तर सरासरी दर १५०० रुपयांवर बऱ्हाणपुरात पोहोचला आहे.

सोमवार ( ता.15 जुलै ) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

जळगाव जिल्ह्यात बाजारात लिलाव होत नाही. खरेदीदार थेट किंवा शिवार खरेदी करतात. जिल्ह्यात केळीचे किमान दर ७०० व कमाल ११०० ते ११५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. त्यात किंचित सुधारणा झाली असून, दर्जेदार केळीस १२०० रुपये दर आहे.

जिल्ह्यातील कमाल केळीची पाठवणूक बऱ्हाणपुरात केली जाते. जिल्ह्यात केळीची आवक स्थिर असून, उशिराच्या मृग बहर बागा व आगाप कांदेबाग केळीत आवक सुरू आहे. खानदेशात सध्या २५५ ते २६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

केळीची शिवारात पॅकिंग करून ती काश्मीर, पंजाब, दिल्ली आदी ठिकाणी पाठविली जात आहेत. काश्मीर, दिल्ली व पंजाब येथे पाठवणुकीच्या केळीला चांगला दर आहे. राज्यात मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर, तसेच छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेशातही केळीची पाठवणूक केली जात आहे.

केळी दरात मात्र चढउतार सुरू आहे. बऱ्हाणपुरातील दराच्या तुलनेत जळगावातील दर कमी आहेत, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात केळी दरावर नियंत्रण आणावे, कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.”

 

व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा 👇🏻🪀🪀
https://chat.whatsapp.com/HYCxSL5E1RX8FEg1kxYQID

🙏 पुढे नक्की शेअर करा 🙏

दररोज केळी बाजार भाव पाण्यासाठी खालील 🍌🍌
व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा 👇🏻🪀🪀
https://chat.whatsapp.com/J0Yo5b3D6Lr6PGOr1WPpPJ

🙏 पुढे नक्की शेअर करा 🙏

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *