Banana Rate : देशात श्रावणमास सुरू आहे. यात आपल्या भागातही सोमवारी (ता. ५) श्रावणमास सुरू झाल्याने केळीला स्थानिक बाजारातही उठाव आहे.

Banana Market : केळी आवकेसह दरातही सुधारणा

Banana Rate : देशात श्रावणमास सुरू आहे. यात आपल्या भागातही सोमवारी (ता. ५) श्रावणमास सुरू झाल्याने केळीला स्थानिक बाजारातही उठाव आहे.

Banana Market

Maharashtra news : देशात श्रावणमास सुरू आहे. यात आपल्या भागातही सोमवारी (ता. ५) श्रावणमास सुरू झाल्याने केळीला स्थानिक बाजारातही उठाव आहे. केळी दरात सुधारणा झाली असून, कमाल दर शिवार खरेदीत १८३५ प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत पोचला आहे.

खानदेशात केळीच्या शिवार खरेदीसंबंधीचा कमाल दर १७०० रुपये प्रतिक्विंटल एवढा मागील आठवड्यात होता. मागील आठवड्यात केळी आवकेत वाढ झाली. सध्या खानदेशात केळीची प्रतिदिन २४० ट्रक (एक ट्रक १६टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवकेत २० ते २२ ट्रकने मागील तीन – चार दिवसात वाढ झाली आहे.

No Supply of Banana Plant : आगाऊ नोंदणी करूनही अनेक पुरवठादारांकडून उतिसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा होत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे.

चोपडा व जळगाव भागात कांदेबाग केळीसंबंधी प्रतिक्विंटल १८०५ रुपये कमाल दर आहे. तर केळीचा किमान दर ९००ते ११०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. देशात उत्तरेकडे श्रावणमास अंतिम टप्प्यात आहे. तर राज्यात सोमवारी श्रावणमास सुरू झाला आहे. यामुळे स्थानिक बाजारासह उत्तरेकडेही केळीला मागणी आहे. यामुळे आवक वाढूनही केळी दरात सुधारणा झाली आहे.

केळीची निर्यातही सुरू असून, जळगावातून रोज सध्या पाच कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळी आखातात पाठविली जात आहे. या केळीसही कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटलवर दर मिळत आहे. दर्जेदार केळी खानदेशातील जळगाव, नंदुरबार, धुळे भागात उपलब्ध आहे. सर्वाधिक केळी चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव आदी भागांत उपलब्ध आहे.

मध्य प्रदेशातही दरवाढ

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरच्या बाजारातही केळी दरात वाढ झाली असून, तेथे रविवारी (ता. ४) लिलावात केळीला कमाल २२५० रुपये प्रतिक्विंटल व किमान १४७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तेथेही आवक वाढली आहे. परंतु उत्तरेकडे खानदेशातील केळीला मागणी आहे.

सोमवार ( ता.05 ऑगस्ट ) रोजी जाहीर केलेलं (ता.06 ऑगस्ट ) साठीचे बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *