Cancer Prevention: रोजच्या जीवनशैलीत करा बदल, कर्करोगासारख्या गंभीर आजारावर राहाल दूर!
- Cancer Health Care :
वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल होत असतात. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या आपल्या आरोग्यावर परिणाम करत असेल तर वेळीच त्याकडे लक्ष द्या.
कर्करोग (Cancer) हा गंभीर आजार असून त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. सध्या भारतात कर्करोगाचे अनेक रुग्ण पाहायला मिळाले आहे. त्यात कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ज्याविषयी आपल्याला माहित नाही. परंतु, निरोगी जीवनशैली (Lifestyle) आणि नियमित तपासणी करुन कर्करोगाचा धोका कमी करता येतो. जाणून घेऊया कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आहारात (Diet) बदल कसा करायचा.
1. व्यायाम
योगासने, व्यायाम आणि शारीरिक हालचाल नियमित करा. यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही सुदृढ राहते. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते त्यामुळे कर्करोगासह अनेक आजारांचा धोका टळतो.
2. आहार
व्यायामानंतर शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी फळांचा समावेश करा. जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा. तसेच जास्त साखर आणि मीठ असलेले पदार्थ खाऊ नका. आहारात बीन्स, कडधान्य, कोबी, ब्रोकोलीसारख्या भाज्यांचा समावेश करा.
3. नियमित तपासणी करा
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि आहारानंतर नियमित शरीराची तपासणी करणे गरजेचे आहे. दर ६ ते ८ महिन्यांनी शरीराची तपासणी करा. ज्यामुळे समस्याचे निराकरण करता येईल.
4. मद्यपान आणि तंबाखूपासून दूर राहा
मद्यपान आणि तंबाखूमुळे आरोग्यावर परिणाम होतो. धुम्रपान आणि तंबाखू खाल्ल्यामुळे फुफ्फुस, तोंड, घसा आणि स्वादुपिंडाचा कर्करोग होतो.
5. सूर्यापासून रक्षण
सूर्याच्या अतिनिल किरणांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. सूर्यप्रकाश शरीरासाठी आवश्यक आहे. यामध्ये व्हिटॅमिन डी एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. जर तुम्ही उन्हात त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचेला नुकसान होऊन कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यासाठी उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.