Mumbai, Thane Weather Updates: मुंबई आणि ठाण्यात पुढील ४८ तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
Mumbai Havaman Andaj : मुंबई आणि ठाण्यात पुढील ४८ तासांत पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याचा सामना करत असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि ठाण्याच्या तापमानात ३-४ अंश सेल्सिअस घट होण्याची अपेक्षा आहे. शनिवारी तापमान किमान २५ डिग्री सेल्सिअस ते कमाल ३३ डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले. वारे उत्तर-पश्चिम दिशेकडून सतत वाहत होते. मुंबईत सूर्य सकाळी ०६:०५ वाजता उगवला आणि संध्याकाळी ०७:०५ च्या सुमारास मावळेल असा अंदाज आहे. रविवार आणि सोमवार तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. बुधवार ते शुक्रवार या कालावधीत तापमानात किंचित घट अपेक्षित आहे.ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.
ठाण्यात रविवारी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. तर, त्याच दिवसापासून मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन भिन्न पवन प्रणालींच्या अभिसरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज आला आहे.
राज्यात अनेक भागांत मान्सून पूर्व पाऊस
राज्यात आज सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला. अनेक ठिकाणी वाऱ्याच्या जोरामुळे झाडे उन्ममळून पडली. मिरज येथे सायंकाळी ०४:०० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. परिणामी शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली. तर, बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. सांगलीतील वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. या परिसरातील ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले.
या भागांत पावसाचा इशारा
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात १८ मे पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
Tamil Nadu Blast: तमिलनाडु में भयंकर विस्फोट, कई लोगों के मारे जाने की आशंका
इस कॉफी के बारे में सुनकर चाय पीने वाले खुश हो जाते हैं, वजह ही कुछ ऐसी है