“निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
loksabha Election – लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचही टप्पे संपले असून आता सगळ्यांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे निकालानंतर काय होईल यावर आता चर्चा सुरू झालीय.
मुंबई – Sharad Pawar on Uddhav Thackeray (Marathi News) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता अखेरचे २ टप्पे उरले आहेत. ४ जूनला निकालात भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा विरोधकांकडून केला जातोय. तर एनडीए पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा सत्तास्थापन करेल असा विश्वास भाजपा नेते करत आहेत. त्यातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात उद्धव ठाकरे निकालानंतर मोदींसोबत जातील अशी चर्चा सुरू झाली. प्रकाश आंबेडकरांनीही हाच दावा केला. याच चर्चेवर शरद पवारांनी थेट भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, निकालानंतर कुठले पक्ष भाजपासोबत जातील हे मी सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रासारखी परिस्थिती देशात निकालानंतर आली तर आमच्यासारखे लोक समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम बनवून जर संधी असेल तर त्याचा पूरेपूर फायदा घेऊ. उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील याची अजिबात शक्यता नाही. अजिबातच नाही. उद्धव ठाकरे भाजपा आणि मोदींसोबत जाणार नाहीत, नाहीत नाहीत असं तीनदा पवारांनी स्पष्ट केले. पत्रकार प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच भाजपानं ७५ वर्षाची वयोमर्यादा पक्षात ठेवलीय त्यात ते आतापर्यंत प्रामाणिक दिसतायेत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन
चुनाव के बीच इकोनॉमी के लिए अच्छी खबर, कितनी रह सकती वृद्धि दर?