2 The Rule: अल्लू अर्जुनने शेअर केला ‘पुष्पा 2’चा मजेशीर पोस्टर, टीझरच्या रिलीज डेटची घोषणा
Allu Arjun Movie: अल्लू अर्जुन आणि निर्मात्यांनी ‘पुष्पा 2: द रूल’चे पोस्टर रिलीज केले आहे. त्याचसोबत त्याने या चित्रपटाच्या टीझरच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहे.
Pushpa 2 The Rule Poster:
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) अपकमिंग चित्रपट ‘पुष्पा 2: द रूल’मुळे (Pushpa 2 The Rule) चर्चेत आहे. अल्लू अर्जनचे चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबतचे एक-एक अपडेट्स जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. अशामध्ये अल्लू अर्जुन आणि निर्मात्यांनी ‘पुष्पा 2: द रूल’चे पोस्टर रिलीज केले आहे. त्याचसोबत त्याने या चित्रपटाच्या टीझरच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहे.
‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये सगळीकडे कुंकू पडल्याचे दिसत आहे. या कुंकूच्या आसपास खूप सारे दिवे लावलेले दिसत आहेत आणि पायामध्ये घुंगरू बांधून कोणी तरी डान्स करत असल्याचे दिसत आहे. हे पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी हा पाय दुसऱ्या कुणाचा नाही तर अल्लू अर्जुनचाच आहे असे म्हटले आहे. सध्या हे पोस्टर व्हायरल होत आहे.
यापूर्वी निर्मात्यांनी आणखी एक पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचे हात दिसत होते. अल्लू अर्जुनने आपल्या हातामध्ये अनेक अंगठ्या घातल्या होत्या आणि नखांना नेलपेंट लावली होती. या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचा टीझर ८ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा वाढदिवस देखील आहे.
पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट याचवर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’सोबत अजय देवगणचा ‘सिंघम अगने’ हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.